Friday, June 5, 2026
HomeUncategorizedयवतमाळ डीबी पथकाची कारवाई; काही तासातच मोटारसायकल चोरी करणारा आरोपी ताब्यात; चार...

यवतमाळ डीबी पथकाची कारवाई; काही तासातच मोटारसायकल चोरी करणारा आरोपी ताब्यात; चार दुचाकी जप्त

(मतीन शेख)

यवतमाळ: शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपीस काही तासांत ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे १ लाख २५ हजार रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय श्रीधर ढवळे रा.चांदोरे नगर, यवतमाळ यांनी २७ मे २०२६ रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या मालकीची एमएच २७ एएस ८३८१ क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल निशांतनगर परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली होती. या प्रकरणी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे गुन्हा क्रमांक २९/२०२६ कलम ३०३(२) बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तपास दरम्यान गोपनीय माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पारस अपार्टमेंट परिसरातील एका पडीत इमारतीमध्ये चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून मनोज भास्कर देमनगुंडे वय ४१ रा.बालाजी मंगल कार्यालय पिंपळगाव यवतमाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एमएच २७ एएस ८३८१ क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने आणखी तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार टीव्हीएस अपाचे, फॅशन प्रो आणि टीव्हीएस एनटॉर्क अशा आणखी तीन वाहनांसह एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे तसेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, पोलीस हवालदार रावसाहेब शेंडे तसेच पोलीस शिपाई गौरव ठाकरे, पवन नांदेकर, पवन तडसे, प्रदीप कुरडकर आणि मयुर तेल्लेवार यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!