Friday, June 5, 2026
HomeUncategorizedबुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने केला सुप्रसिद्ध घाटपुरी मंदिर चोरीचा पर्दाफाश; आरोपी अटक,...

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने केला सुप्रसिद्ध घाटपुरी मंदिर चोरीचा पर्दाफाश; आरोपी अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त! नागरिकांकडून कौतुकाची थाप

(मतीन शेख)

 

बुलढाणा : जगात प्रसिद्ध असलेल्या खामगाव घाटपुरी येथील जगदंबा देवी संस्थान मंदिरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. आरोपीकडून तब्बल ३ लाख २० हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने घाटपुरी येथील जगदंबा देवी संस्थान मंदिराच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर देवी आणि गणपतीच्या मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे ७३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने आरोपी अमोल काशीराम तेलगोटे वय ३९ रा. रिधोरा, जि. अकोला याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून २० ग्रॅम २० मिली वजनाची सोन्याची लगड जप्त केली असून तिची किंमत सुमारे ३ लाख २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय पंकज सपकाळे, एएसआय राजेंद्र अंभोरे, एलएचसी वनिता शिंगणे, पोलीस कर्मचारी अमोल शेजोळ, अजिस परसुवाले, मनोज खर्डे, शिवानंद हेलगे पोलीस कर्मचारी कैलास ठोंबरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. मंदिर चोरीसारखा संवेदनशील गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले जात आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!