Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedचार निष्पाप लेकरांची बापाने हत्या करून स्वतः केली आत्महत्या! जळगाव जामोद तालुक्यातील...

चार निष्पाप लेकरांची बापाने हत्या करून स्वतः केली आत्महत्या! जळगाव जामोद तालुक्यातील घटना; पोलिस तपास सुरू 

(मतीन शेख)

 

बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शेत शिवारात एका विहिरीत एकाच कुटुंबातील पाच मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विजय मुसा किराडिया यांनी आपल्या दोन मुली आणि दोन मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रित विजय किराडिया वय ७, प्राची विजय किराडिया वय ५, पुर्वी विजय किराडिया वय ४ आणि पियुष विजय किराडिया वय २ अशी मृत मुलांची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विजय किराडिया यांनी पत्नीला एक दिवस आधीच माहेरी सोडून आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आज दि.२५ मे रोजी सकाळी राजुरा बुद्रुक शिवारातील विहिरीत पाचही मृतदेह आढळून आले. ही घटना समोर येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन आणि फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमागील सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला असून, सर्वत्र दुःख आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. जळगाव जामोद पोलिस स्टेशन येथे मुसा रालजी किराडिया वय ६३ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम १०३(१) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!