(मतीन शेख)
बुलढाणा: शिक्षण क्षेत्रासह सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते शेख मोबीन शेख रहमान यांची मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेख मोबीन शेख रहमान यांनी कार्य केले आहे. सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत समाजहितासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रिझवान खान यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या नियुक्तीमुळे बुलढाणा उत्तर जिल्ह्यात संघटनेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना गती देण्यासाठी तसेच गरजू घटकांपर्यंत विविध कल्याणकारी उपक्रम पोहोचविण्यासाठी शेख मोबीन शेख रहमान यांच्या नेतृत्वाचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती आणि हितचिंतकांनी स्वागत केले असून, शेख मोबीन शेख रहमान यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.