Sunday, September 20, 2026
HomeUncategorizedजुबेर सहारा यांची जिल्हा काँग्रेस सचिवपदी नियुक्ती; शेगावात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून...

जुबेर सहारा यांची जिल्हा काँग्रेस सचिवपदी नियुक्ती; शेगावात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त सत्कार

(मतीन शेख)

 

शेगाव : बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी जुबेर सहारा यांची नियुक्ती झाल्याने शेगावातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नियुक्तीबद्दल शेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने जुबेर सहारा यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जुबेर सहारा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रकाश भाऊ शेगोकार, शहराध्यक्ष कैलास देशमुख, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे, नगरसेवक अंबादास इंगळे, इरफान पठाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जुबेर सहारा यांना त्यांच्या आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या नियुक्तीमुळे शेगाव तालुक्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक चालना मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी सहारा यांच्या नियुक्तीचे स्वागत करत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!