(मतीन शेख)
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साजिद खान पठाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे. सामान्य जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे साजिद खान पठाण यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षाची अल्पसंख्यक विभागातील संघटनात्मक ताकद वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या नियुक्तीमुळे राज्यभरातील अल्पसंख्यक समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल तसेच पक्षसंघटना अधिक मजबूत होऊन समाजहिताच्या उपक्रमांना नवी गती मिळेल, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत. याप्रसंगी साजिद खान पठाण यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची संघटना अधिक सक्षम होवो आणि समाजसेवेच्या कार्याला नवी दिशा मिळो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहायक सय्यद अहमद यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.