Sunday, September 20, 2026
HomeUncategorizedअळसणा येथील अयान मिर्झा इलेक्ट्रिकल इंजिनिअर! गावकऱ्यांकडून सत्कार;

अळसणा येथील अयान मिर्झा इलेक्ट्रिकल इंजिनिअर! गावकऱ्यांकडून सत्कार;

(मतीन शेख)

अळसणा येथील रहिवासी मिर्झा अयान इरफान बेग यांनी पुणे येथील पद्मश्री डॉ. व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी यशस्वीरीत्या संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल अळसणा गावातील नागरिकांनी त्यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी अयान यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अयान यांच्या या यशामुळे अळसणा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या यशाचा गावकऱ्यांना अभिमान वाटत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व अळसणा ग्रामस्थांनी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!