(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विवेक मनोहरराव राऊत यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे १५ मार्च रोजी आयोजित समता परिषदेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. परिषदेचे संस्थापक व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते विवेक राऊत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. समाजकार्यात सक्रिय सहभाग आणि सामाजिक प्रश्नांबाबत असलेली बांधिलकी लक्षात घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही सामाजिक समता, शिक्षण व वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्य करणारी संघटना म्हणून ओळखली जाते. संघटनेच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना विवेक राऊत यांनी सांगितले की, “संस्थापक नामदार भुजबळ साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.”