(मतीन शेख)
अकोला: हिवरखेड येथील सैय्यद अनस सैय्यद मुन्शी हा मुलगा आज दि.७ एप्रिल दुपारपासून अचानक बेपत्ता झाला असून, त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेमुळे कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनस याला हिवरखेड बस स्थानकाजवळ पाहण्यात आले होते. त्यानंतर तो कोणत्या दिशेने गेला किंवा कोणत्या वाहनात बसला याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे. संबंधित मुलाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ ९८२२९०२५१५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सतर्कतेतून आणि सहकार्यामुळे मुलाचा लवकरात लवकर शोध लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.