Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedगरम पक्कडीचे चटके, धमक्या आणि अत्याचार! आरोपी कीर्तनकार अटक

गरम पक्कडीचे चटके, धमक्या आणि अत्याचार! आरोपी कीर्तनकार अटक

 

(मतीन शेख)

 

अहिल्यानगर: जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. वारकरी परंपरेशी संबंधित असलेल्या एका कीर्तनकारावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ वय ३८ हा पीडित मुलीच्या घराशेजारी राहत होता. ओळखीच्या संबंधाचा फायदा घेत त्याने मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच विरोध केल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे. १० मार्च रोजी मुलीला फोन करून आपल्या घरी बोलावल्याचा आरोप असून तेथे तिला बोलावून मारहाण करून तीच्या अंगावर गरम पक्कडीचे चटके देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर मुलीची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांना संशय आला. दरम्यान १४ मार्च रोजी कुटुंबीयांनी तिच्याशी संवाद साधल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!