Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedमेळघाट पॅशन ट्रेल उपक्रमाचे नागपुरात उद्घाटन; इन्फ्लुएन्सर्सना मेळघाटच्या जैवविविधतेचा अनुभव

मेळघाट पॅशन ट्रेल उपक्रमाचे नागपुरात उद्घाटन; इन्फ्लुएन्सर्सना मेळघाटच्या जैवविविधतेचा अनुभव

(मतीन शेख)

 

नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने आयोजित ‘मेळघाट पॅशन ट्रेल’ या उपक्रमाचे उद्घाटन नागपुरात उत्साहात पार पडले.या उपक्रमाच्या माध्यमातून वनविभागाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे नैसर्गिक सौंदर्य,समृद्ध जैवविविधता आणि स्थानिक संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे,व त्याचप्रमाणे इको पार्क मधील महिला बचत गटांनी घेतलेल्या कॅन्टीनमध्ये जेवणाचा स्वाद घेतला त्याच त्याचप्रमाणे महिला बचत गट चे कौतुक केले. दि.२९ व ३० मार्च रोजी विविध इन्फ्लुएन्सर्स अंबाबरवा अभयारण्यात दाखल झाले. त्यांचे स्वागत वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे सोनाळा यांनी केले. या दोन दिवसांत इन्फ्लुएन्सर्सनी जंगल सफारी, विविध एडवेंचर उपक्रम तसेच वसाली संकुल येथे वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधत मेळघाटच्या नैसर्गिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या कार्यक्रमावेळी उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया (DCF), सहाय्यक वनसंरक्षक जी.पी.टेकाळे (ACF), वनपरीक्षेत्र अधिकारी ए.एन.बावणे सोनाळा, वनपाल जी.टी.सोळंखे, एस.डी.राठोड तसेच वनरक्षक डी.ए.बेराड, राणी गरुड, आर.पी.काठोळे उपस्थित होते. या उपक्रमामुळे इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून मेळघाटातील निसर्गसौंदर्य, वन्यजीव आणि स्थानिक संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचवतील. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच यामुळे पर्यटकांचे आकर्षण वाढून स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास वनपरीक्षेत्र अधिकारी सोनाळा यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!