Friday, June 5, 2026
Homeक्राइम न्यूज़सोनाळा पोलिसांची मोठी कामगिरी; ५ देशी पिस्तुल, १६ काडतूस आणि चारचाकी वाहनसह...

सोनाळा पोलिसांची मोठी कामगिरी; ५ देशी पिस्तुल, १६ काडतूस आणि चारचाकी वाहनसह मध्यप्रदेशातील दोन आरोपींना अटक

 

(मतीन शेख)

 

बुलडाणा: जिल्ह्यातील सोनाळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ५ देशी बनावटीच्या पिस्तुलांसह दोन अतिरिक्त मॅग्झीन, १६ जिवंत काडतुसे, एक कार, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक करण्यात आली असून एक शस्त्र पुरवठादार आरोपी फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सविस्तर वृत्त अशे की, आज दि.२७ ऑक्टोबर रोजी सोनाळा पोलिस ठाण्यात सपोनि चंद्रकांत पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, टुनकी ते सोनाळा रोडवरून काही इसम अवैधरित्या देशी पिस्तुल घेऊन जाणार आहेत. या माहितीवर पोलिसांनी हनुमान मंदिराजवळ सापळा रचला. थोड्याच वेळात टुनकीकडून येणारी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर क्रमांक एमपी २० सीजी १६९७ गाडी थांबवून तपासणी केली असता वाहनातून ५ देशी बनावटीच्या स्टील पिस्तुल किंमत २ लाख रुपये, २ स्टील मॅग्झिन किंमत ६ हजार, १६ जिवंत काडतुसे किंमत १६ हजार, चारचाकी स्विफ्ट डीझायर किंमत ५ लाख, २ मोबाईल किंमत १० हजार रुपये आणि रोख रक्कम १ हजार ६०० रुपये असा एकूण ७ लाख ३३ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहम्मद नफिज अकिल अली वय २४ मोहम्मद उबेद रझा मोहम्मद अल्फाज वय २१ दोघेही रा. चांदामेठा, ता. परासिया, जि. छिंदवाडा (मध्य प्रदेश) अशे आरोपीची नावे आहेत. तसेच पिस्तुल पुरवणारा एक अनोळखी इसम सध्या फरार आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सोनाळा येथे गु.र.क्र. २७०/२०२५ असा गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम ३,७, २५ अंतर्गत दाखल करण्यात आला असून सदर तपास सुरू आहे. सदर कारवाई ठाणेदार सपोनि चंद्रकांत पाटील, पोहेकॉ विशाल गवई, पोहेकॉ रमेश खरात, पो.कॉ. राहुल पवार, पो.कॉ. शेख इमराण, पो.कॉ. गणेश मोरखडे, पो.कॉ. राजू गव्हाणे, पो.कॉ. संजय सास्ते, पो.कॉ. गणेश राठोड यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!