Friday, June 5, 2026
HomeUncategorizedराज्य शासनाच्या जाहिरातीची दर्यापूर च्या आमदारांनी केली पोलखोल

राज्य शासनाच्या जाहिरातीची दर्यापूर च्या आमदारांनी केली पोलखोल

दर्यापूर (तालुका प्रतिनिधी)महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ , मुंबई येथे सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आपल्या खास शैलीतून राज्य सरकारवर तुटून पडले होते. अतिशय मुद्देसुत विषयावर बोलत असताना राज्य शासनाने जाहिरातीवर केलेल्या खर्चावर आक्षेप घेत सर्वसामान्य जनतेचा पैस्याने जाहिरातीवर अधाधुंद खर्च होत असताना एका खटारा बस वरील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची जाहिरात सभागृहात आजितदादा पवार दाखवत होते.

परंतु त्याच दरम्यान दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक जाहिरात सभागृहात दाखवून राज्य शासनाची पोलखोल केली. यावेळी सभागृहात दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे यांनी राज्य शासनाच्या जाहिरातीची पोलखोल केल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान उल्लेख केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!