Friday, June 5, 2026
Homeक्राइम न्यूज़एसीबीचा यशस्वी सापळा! शेगावात दोन तलाठी अडकल्याने खळबळ; अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात...

एसीबीचा यशस्वी सापळा! शेगावात दोन तलाठी अडकल्याने खळबळ; अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात पन्नास हजारांची मागितली लाच

 

(मतीन शेख)

 

बुलढाणा: अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात पन्नास हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन तलाठ्यांना अँटी करप्शन ब्युरो (ACB) अकोला यांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी शेगाव येथे अटक केली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माटरगाव येथील तलाठी अरुण डाबेराव यांनी तक्रारदाराच्या चुलत भावाची जेसीबी व दोन डंपर अशी तीन वाहने अवैध मुरुम उत्खननाच्या कारणावरून पकडली होती. संबंधित वाहने तहसील कार्यालयात जप्त करण्याची धमकी देत त्यांनी ही कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे ५०,००० रुपयांची लाच मागितली. त्यापैकी १९,००० रुपये स्वीकारण्यात आले, तर उर्वरित ३१,००० रुपये दुसऱ्या दिवशी आणण्यास सांगितले.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ११ सप्टेंबर रोजी एसीबी अकोला कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने पहिला सापळा रचला. त्या वेळी डाबेराव यांनी लाच रक्कम कमी करून २०,००० रुपये मागणी केली आणि ती रक्कम दुसरे तलाठी अमोल गीते यांच्याकडे द्यावी असे सांगितले.

यानंतर २२ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा सापळा रचण्यात आला. मात्र, डाबेराव यांना संशय आल्यामुळे त्यांनी लाच स्वीकारण्यास नकार दिला आणि कारवाई अपूर्ण राहिली. अखेर, सातत्याने प्रयत्न केल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी दोन्ही तलाठ्यांना लाच मागणी आणि स्वीकृती प्रकरणात रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई एसीबी अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, तसेच उपअधीक्षक मिलिंदकुमार अ. बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण वेरूलकर व त्यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!