Friday, September 18, 2026
HomeUncategorizedतामगाव व सोनाळा पोलीस ठाणे हद्दीत ७८ गणेश मंडळांची स्थापना! गणेशोत्सवावर पोलिसांची...

तामगाव व सोनाळा पोलीस ठाणे हद्दीत ७८ गणेश मंडळांची स्थापना! गणेशोत्सवावर पोलिसांची करडी नजर

(मतीन शेख)

 

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त तामगाव व सोनाळा पोलीस ठाणे हद्दीत यंदा एकूण ७८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातील गणेश मंडळांचा समावेश आहे. तामगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी परवानाधारक एकूण ५३ श्री गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली. यामध्ये शहरी भागातील ३, तर ग्रामीण भागातील ५० गणेश मंडळांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागातील १५ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमांतर्गत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, सोनाळा पोलीस ठाणे हद्दीत सोनाळा शहरातील ९, तर ग्रामीण भागातील १६, अशा एकूण २५ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली असून, उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!