Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedमहसूल विभागाला मोठा धक्का; केज तहसीलदाराचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

महसूल विभागाला मोठा धक्का; केज तहसीलदाराचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

 

(मतीन शेख)

 

बीड: जिल्ह्यासाठी आजची पहाट अत्यंत वेदनादायी ठरली. केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा लातूर–अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात मृत्यू झाला. ही दुर्घटना आज दि.९ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजता रेणापूर फाट्याजवळ घडली. गिड्डे हे स्वतः वाहन चालवत असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की त्यात त्यांचा जागीच अंत झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. राकेश गिड्डे हे कर्तव्यदक्ष आणि जनतेशी जोडलेले अधिकारी म्हणून ओळखले जात होते. केज तालुक्यात त्यांनी अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली होती. त्यांच्या अचानक जाण्याने प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रेणापूर पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!