Tuesday, April 14, 2026
Homeक्राइम न्यूज़१८ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार! सुनगाव गावाला हादरवणारी विकृतीची संतापजनक घटना

१८ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार! सुनगाव गावाला हादरवणारी विकृतीची संतापजनक घटना

प्रतिनिधी | मतीन शेख

बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना सुनगाव येथे समोर आली आहे. अवघ्या १८ महिन्यांच्या निष्पाप चिमुरडीवर एका ५५ वर्षीय विकृताने अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडली. मधुकर पुंजाजी हागे (वय ५५, रा.सुनगाव) या व्यक्तीने “आंबा खायला देतो” असे म्हणत चिमुरडीला घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला, असा गंभीर आरोप आहे. अर्ध्या तासानंतर चिमुरडीचा रडण्याचा आवाज ऐकून तिची आई धावली. मुलीला उचलून पाहिले असता, तिच्या शरीरावर रक्ताचे डाग दिसले. संशय आल्याने नीट पाहणी केली असता भीषण वास्तव उघडकीस आले. रडत असलेल्या चिमुरडीने अनवधानाने सांगितलेल्या इशाऱ्यांमधून कुटुंबीयांचा विश्वासच उडाला. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा क्र. ३७३/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६५(२) व पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी तात्काळ पावले उचलत पोलीस नाईक इरफान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ही घटना केवळ सुनगाव नव्हे, तर संपूर्ण जळगाव जामोद तालुक्याला हादरवून गेली असून समाजमन सुन्न झाले आहे. एका निष्पाप जीवाच्या आयुष्यावर घाला घालणाऱ्या विकृत प्रवृत्तीविरुद्ध कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!