Sunday, September 20, 2026
Homeनेशनल न्यूज़स्विफ्ट कारमधून चौघा विद्यार्थ्यांचे अपहरण; पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, आरोपी ताब्यात

स्विफ्ट कारमधून चौघा विद्यार्थ्यांचे अपहरण; पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, आरोपी ताब्यात

(मतीन शेख)

 

बुलढाणा: मलकापूर शहरातील गांधी चौक परिसरात दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडवली. सकाळी साडेआठच्या सुमारास एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून तिघा शालेय विद्यार्थ्यांसह एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलं. तीन अज्ञात अपहरणकर्त्यांनी ही कारवाई करत चारही विद्यार्थ्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेलं.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. बुलढाणा पोलिसांनी त्वरित कारवाई करत कारचा पाठलाग सुरू केला. मोताळा परिसरात पोलिसांनी ती कार अडवत, अपहरणकर्त्यांना सिनेस्टाईल थरारात पकडलं. या कारमधून चारही विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपहरणाच्या धक्क्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले असून समुपदेशन सुरू आहे.

दरम्यान, संतप्त नागरिकांनी अपहरणकर्त्यांना पकडल्यानंतर चांगलाच चोप दिला आणि कारची तोडफोड केली. बोराखेडी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. हे आरोपी कोण आहेत? त्यांनी कार कुठून आणली? अपहरणामागचा हेतू काय होता? याचा तपास पोलीस करत आहेत. नागरिकांच्या सतर्कतेने आणि पोलिसांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!