(मतीन शेख)
बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आज दि.२६ एप्रिल रविवारी रोजी सकाळी अज्ञात महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास शेतात धडापासून वेगळे झालेले मुंडके आढळून आले. मुंडक्यावरील मास आणि केस मोठ्या प्रमाणात गळून गेलेले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. त्यानंतर शोध घेतल्यावर काही अंतरावर संबंधित महिलेचे धडही सापडले. सदर मृतदेह महिलेचा असल्याची माहिती समोर आली असून, तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

