Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedअल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण; सोनाळा पोलीसांनी आरोपींना केली तात्काळ अटक

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण; सोनाळा पोलीसांनी आरोपींना केली तात्काळ अटक

(मतीन शेख)

 

संग्रामपूर : सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा क्रमांक ११६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुख्य आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले. या प्रकारामुळे अल्पवयीन पीडिता गर्भवती झाल्याचे समोर आले आहे. तसेच इतर दोन आरोपींनी पीडितेला आरोपीसोबत राहण्यास भाग पाडून फिर्यादी व तिच्या मुलीला धमक्या दिल्याचेही निष्पन्न झाले आहे. रमेश राजू सोळंके, गणेश राजू सोळंके व राजू काशीराम सोळंके अशी आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून विशेष पथकाच्या मदतीने अवघ्या एका तासात तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. तपास पथकात पोउपनि महादेव खोने, पोका राहुल पवार, संजय सास्ते व रमेश खरात यांचा समावेश होता. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!