Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedलोहारा येथे ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका; जुगार अड्ड्यावर छापा, १७ आरोपी जेरबंद!

लोहारा येथे ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका; जुगार अड्ड्यावर छापा, १७ आरोपी जेरबंद!

(मतीन शेख)

 

अकोला: अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने सुरू केलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेंतर्गत अकोल्यात मोठी कारवाई उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोहारा शेतशिवार ता. बाळापूर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १७ आरोपींना पकडले. गोपनीय माहितीच्या आधारे २१ मार्च रोजी सायंकाळी छापा टाकण्यात आला. पोलिसांनी अचानक कारवाई करत जुगार खेळणाऱ्या आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. या वेळी एकूण ४.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छाप्यात ५२ ताश पत्त्यांचे संच, ९६ हजार रोख रक्कम, ७ मोबाईल फोन सुमारे ७० हजार तसेच ३ मोटरसायकली २.७० लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात “ऑपरेशन प्रहार” मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय विजय चव्हाण, हेकॉ महेंद्र मलिया, उमेश पराये, भास्कर धोत्रे, कुशाल नेमाडे, रवी खंडारे, पोकॉ राज चंदेल, करण मानकर, अभिषेक पाठक, श्रीकांत पातोंड, चालक जीपीएसआय ठाकरे व पोकॉ खरात यांनी ही कारवाई पार पाडली.

 

या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे👇🏻

(१) निखिल श्रीकृष्ण अग्रवाल वय ३५ वर्ष रा. पंचगव्हाण (२) सागर साहेबराव नांदोकर वय ४० वर्ष रा. भूत बंगला शेगाव (३) गणेश महादेव ताथोड रा.हातरून जि. अकोला (४) अजय लक्ष्मण चंडाळणे वय ४५ वर्ष रा. शेगाव (५) आशिष दिगंबर ठाकरे रा. रोकडिया नगर, शेगाव (६) अमीन इसामेर देशमुख वय ४३ वर्ष रा. लोहारा (७) अक्षय संतोष मोहोळ वय २४ वर्ष रा. उमरी अकोला (८) आसिफ लतीफ देशमुख रा. लोहारा १) संतोष रामगीर गिरी वय ५२ वर्ष रा. एकलारा ता. संग्रामपूर (१०) धरम गणेश सारवाण रा.अकोट रोड, शेगाव (११) अंकुश श्रीराम मेटांगे वय ३२ वर्ष रा.झुरळ (१२) सचिन बाबुराव कोकाटे वय ४० वर्ष एकलारा, ता. संग्रामपूर (१३) सतीश गोपाल झगडे वय २६ वर्ष रा. एकलारा, ता. संग्रामपूर (१४) सागर संजय खांदोडे वय ३५ वर्ष रा. शेगाव (१५) मंगेश तेजराव हिंगणे वय ४० वर्ष रा. भूत बंगला, शेगाव (१६) ज्ञानेश्वर सुरेश गारमोडे वय ४० वर्ष रा. बालाजी नगर, शेगाव (१७) गजानन वसंत देशमुख (वय ३५ वर्ष) रा. रिसोड, जि. वाशिम अशी आरोपींची नावे आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!