Sunday, November 22, 2026
Homeमहाराष्ट्र न्यूज़युवक काँग्रेस कार्यकर्ते प्रतीक बोचे यांच्या मागणीला यश नालीची साफ सफाई, वृतांची...

युवक काँग्रेस कार्यकर्ते प्रतीक बोचे यांच्या मागणीला यश नालीची साफ सफाई, वृतांची घेतली दखल

 

दर्यापूर ( तालुका प्रतिनिधी) दर्यापूर नगरपरिषद मध्ये गेल्या कित्येक दिवसापासून प्रशासक राज पालिकेत सुरू आहे. तरीसुद्धा एक हाती सत्ता प्रशासकाची असून कामामध्ये दिरंगाई होत असल्याचे शहरवासी यांनी व्यक्त केले. पालिकेतील कर्मचारी हे सुद्धा नागरिकांना सहकार्य करण्याच्या मासिकतेत दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांना गेल्या पावली परत यावे लागत आहे. तर शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्याचा तीव्र रोष पालिकेवर व्यक्त होत आहे. तर दर्यापूर शहरात घाणीचे साम्राज्य वऱहांचा हैदोस, गटार व्यवस्था, नालीतील पाणी रस्त्यावर तर घंटा गाडीमध्ये अनियमितता असल्याने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते प्रतीक बोचे यांनी गेल्या काही दिवसा अगोदर वृत्तपत्राच्या माध्यमातून पालिकेला सफाई करण्याची मागणी केली होती. त्या वृत्ताची दखल घेत पालिकेतील कर्मचाऱ्यांनी नाली सफाई करण्याचा श्री गणेशा केला. त्यामुळे प्रतीक बोचे यांनी पालिका कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. भविष्यात अशाच प्रकारचे पालिका कर्मचारी यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा बोचे पाटील यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!