दर्यापूर (तालुका प्रतिनिधी)
दि. १९ विविध मागण्यांच्या पूर्तता व्हावी याकरीता दर्यापूर तालुक्यातील विदर्भ पटवारी संघाच्यावतीने दर्यापूर तहसील कार्यालयासमोर गुरूवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अमरावती विभागातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी पदोन्नती देण्यात आल्या मात्र अमरावती जिल्ह्यात अजून पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित आहे. शासनाकडून पटवारी वर्गांना देण्यात आलेले लॅपटॉप निकृष्ट दर्जाचे देण्यात आल्याने काम करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. लॅपटॉप सुधारित चांगल्या प्रकारचे देण्यात यावे, या इतर आर्थिक व सेवा विषयक महत्त्वपूर्ण मागण्या घेऊन गुरुवारी विदर्भ पटवारी संघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा विदर्भ पटवारी महासंघातर्फे देण्यात आला.या आंदोलनात शहरासह तालुक्यातील पटवारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रविकांत भटकर, महेश डोरले, गजानन पांडे,अरुण तायडे, शरद दयालकर, नंदू जावरकर, सौरभ वानखडे, अतुल दाळू, भारत महाजन, विजय वाघमारे, विश्वनाथ गोंडाणे, कल्पना कासारकर, रश्मी इंगळे, स्वाती पांडे, रीना डिके, सुमा बाभळीकर, नमिता बायस्कार व विदर्भ पटवारी संघाचे इतर सदस्य उपस्थित होते.

