Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedयवतमाळ पोलिस शहर येथील डीबी पथकाची धडक कारवाई: नागपूर बायपासवर दोन गावठी...

यवतमाळ पोलिस शहर येथील डीबी पथकाची धडक कारवाई: नागपूर बायपासवर दोन गावठी पिस्तुलांसह एकाला अटक

(मतीन शेख)

 

यवतमाळ : शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत नागपूर बायपास परिसरातून एका संशयिताला दोन गावठी पिस्तुलांसह अटक केली. दि.६ मे रोजी सायंकाळी आरोपीकडून दोन जिवंत काडतुसे आणि दुचाकीसह सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती गावठी पिस्तुल घेऊन नागपूर बायपास परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ विशेष पथक तयार करून परिसरात सापळा रचला. संशयित व्यक्ती दिसून येताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आरोपीने आपले नाव सजीत रावसाहेब कदम वय ४६ रा. शुभम अपार्टमेंट संकट मोचन रोड माईंदे चौक ह.मु.समर्थवाडी यवतमाळ असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल व त्यामध्ये दोन जिवंत काडतूस मिळून आले. तसेच त्याच्या जवळील दोनचाकी टीव्हीएस ज्युपिटरची तपासणी केली असता त्या गाडीच्या डिक्कीत एक पिस्टल व त्यामध्ये दोन जिवंत काडतूस आढळून आले. तसेच घटनास्थळी असलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकचे पो.उपनिरीक्षक गणेश सपकाळ, परी.पो.उपनिरीक्षक दिपक घोगरे, पोहवा. रावसाहेब शेंडे, किरण पडघण, पोशि. गौरव ठाकरे, पवन नांदेकर, पवन तडसे, मयुर तेल्लेवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!