(मतीन शेख)
बुलढाणा: मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्राम दाताळा शिवार येथे अवैध देशी दारू साठ्यावर पोलिसांनी धाडसत्र राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १ लाख ६ हजार १४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे. देशी दारूचे १४ बॉक्स किंमत ५६ हजार रुपये, सात वायरच्या गोण्या किंमत १४० रुपये, एक मोटारसायकल किंमत ५० हजार रुपये असा एकूण १ लाख ६ हजार १४० रुपये किमतीचा अवैध माल हस्तगत करण्यात आला आहे. सुरतसिंग नयनसिंग राजपुत वय ३६ वर्षे रा.घिरणी अशे आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप. पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा व श्रेणिक लोढा खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल गणेश वाघ स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नपोकॉ अंनता फरतळे, नपोकॉ सुनिल मिसाळ, व पोकॉ गणेश वाघ यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पोलीस प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीला चांगलाच आळा बसणार आहे.