Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedबुलढाण्यात एसीबीची धडक कारवाई: वनविभागातील दोन अधिकारी निघाले खादाड!

बुलढाण्यात एसीबीची धडक कारवाई: वनविभागातील दोन अधिकारी निघाले खादाड!

 

(मतीन शेख)

 

बुलढाणा: उपवनसंरक्षक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दि.३१ डिसेंबर रोजी मोठी कारवाई करत वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक (ACF) अश्विनी आपेट आणि कर्मचारी अमोल मोरे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, कापलेल्या लाकडाची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात दोघांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये स्वीकारताना ACB च्या पथकाने बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारदाराने लाच मागितल्याची तक्रार ACB कडे केल्यानंतर प्राथमिक पडताळणी करून आज हा ट्रॅप लावण्यात आला. अटकेनंतर दोन्ही आरोपींना ACB ने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई व चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे बुलढाणा वनविभागात एकच खळबळ उडाली असून, पुढील तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!