Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedकाकणवाडा बु. येथे बिबट्याचा धुमाकूळ! ५ शेळ्या ठार

काकणवाडा बु. येथे बिबट्याचा धुमाकूळ! ५ शेळ्या ठार

 

(मतीन शेख)

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बु. येथील रहिवासी गजानन देवराव हिप्परकार यांच्या कोठ्यात आज दि.३१ डिसेंबर रोजी पहाटे बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ५ शेळ्या जागीच ठार झाल्या असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाला कळवले आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून काही ठिकाणी कॅमेरा लावण्यात आला असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!