महाराष्ट्र हेड प्रतिनिधी: मतिन शेख
राज्यातील अनेक भागांत मागील काही दिवसा पासुन ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यातील विविध भागात टप्प्याटप्प्या प्रमाणे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्या मध्ये ग्रामिण भागाला मोठा फटका बसला आहे. शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा, खामगावसह जिल्ह्यातील तेरा हि तालुक्यात वादळसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. संत्रा, हरभरा, गहू, मका, कांदा या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संग्रामपुर तालुक्यातिल टुनकी, लाडणापुर, पंचाळा, पातुर्डा, वरवट बकाल, या सारख्या गावात वादळी वार्यासह पिकांचे चांगलेच नुकसान केले. वादळी वार्या मध्ये शेतातील संत्रा खाली पडलेला दिसत आहे. तसेच बुलढाणा तालुक्यातील साखळी येथे विज पडून १८ मेंढ्या दगावल्याची घटना घडली आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकारने पंचनामा करुन शेतकर्यांना तातडीने मदत करावी, अशी मांगणी शेतकरी करत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात ९ मार्च पर्यंत अवकाळी पावसासह गारपिटची शक्यात आहे.

