खोलापुर – दि. ३१/०५/२०२३ रोज बुधवारला पांढरी (खोलापूर) दारापूर येथे विर अहिल्यादेवी सभागृहामध्ये प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेची जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्सहात पार पडला. कार्यक्रमामध्ये महिलांचा सत्कार सुध्दा करण्यात आला. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती देवलताई घुरडे यांनी भुषवीले तथा प्रमुख उपस्थिती सौ. सिमाताई घुरडे, सौ. सविताताई सरोदे, सौ. सरलाताई इसळ ह्या होत्या. कार्यक्रमामध्ये महिलांना मान देण्यात आला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तथा बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विश्वंभर पाटील मारके यांनी केले. मार्गदर्शन भा.बा. काळे यांनी केले. संचालन अतुल घुरडे तथा आभार प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन अशोकराव लामसे (सदस्य ग्रा.पं. खोलापूर पांढरी) यांनी केले.

