Monday, April 13, 2026
Homeक्राइम न्यूज़पळशी झाशी येथे अवैध दारू भट्ट्यांवर पोलिसांची कारवाई; ग्रामस्थांच्या निवेदनानंतर पोलीस ऍक्शन...

पळशी झाशी येथे अवैध दारू भट्ट्यांवर पोलिसांची कारवाई; ग्रामस्थांच्या निवेदनानंतर पोलीस ऍक्शन मोडवर

(प्रतिनिधी – मतीन शेख)

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी गावात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाविरोधात अखेर पोलिसांनी निर्णायक कारवाई केली. १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत घेतलेल्या ठरावानंतर आणि पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. दि.१९ ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकिसन माळी यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू भट्ट्यांवर छापा टाकण्यात आला व त्या नष्ट करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून गावात अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांत संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याचा निषेध म्हणून १५ ऑगस्ट रोजी गावातील सरपंच सौ. प्रियांका राहुल मेटांगे, माजी सैनिक व उपसरपंच पंचफुलाबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांच्या उपस्थितीत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर संग्रामपूर पोलीस ठाण्याला निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकिसन माळी यांनी टीमसह गावात सापळा रचून अवैध दारू भट्ट्यांवर धाड टाकली. या कारवाईत शेख सलीम शेख सत्तार होमगार्ड, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मारोडे, तसेच सरपंच पती राहुल मेटांगे हे उपस्थित होते. अवैध भट्ट्या नष्ट केल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कारवाईनंतर गावातील ग्रामसेवक हेमंत बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकिसन माळी, होमगार्ड शेख सलीम व प्रफुल मारोडे यांचा शाल व श्रीफळ देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेने सत्कार करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गावात शांतता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचे योगदान मोलाचे असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!