Friday, June 5, 2026
HomeUncategorizedनांदुरा पोलिस स्टेशन हद्दीत एलसीबीची धडक मोहीम; अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत...

नांदुरा पोलिस स्टेशन हद्दीत एलसीबीची धडक मोहीम; अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत ७६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

(मतीन शेख)

 

बुलढाणा: जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत ५ टिप्पर व वाळूसह तब्बल ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड व अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार दि.२१ मे रोजी ही विशेष कारवाई राबविण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे पिवळ्या रंगाचे दोन ब्रास क्षमतेचे ५ टिप्पर पकडले. जप्त करण्यात आलेल्या टिप्परची किंमत अंदाजे ७५ लाख रुपये असून टिप्परमध्ये भरलेली वाळू किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. असा एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच गौण खनिज अधिनियम कलम २१ (१), (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजोळ, अजीज परशुवाले, मनोज खर्डे व चालक पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद हेलगे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!