Tuesday, April 14, 2026
Homeक्राइम न्यूज़धनादेश अनादरप्रकरणी अंकित पंचमीयाला दोन वर्षांचा कारावास आणि ३.९८ लाखांचा दंड; ...

धनादेश अनादरप्रकरणी अंकित पंचमीयाला दोन वर्षांचा कारावास आणि ३.९८ लाखांचा दंड; तक्रारदार रवी अग्रवाल यांच्या तक्रारीवरून न्यायालयाचा निर्णय

प्रतिनिधी | मतीन शेख

धनादेश अनादरप्रकरणी अकोल्यातील अंकित पंचमीयाला दोन वर्षांच्या सक्त कारावासाची आणि ३ लाख ९८ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. ही कारवाई तक्रारदार रवी प्रकाश अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर झाली. पंचमीयाने अग्रवाल यांच्याकडून १ लाख ९९ हजार रुपये हुंडी चिठ्ठीच्या माध्यमातून ठेव रक्कम म्हणून घेतली होती. ही रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश बँकेत अपूर्ण शिल्लकीमुळे वठला नाही. त्यामुळे अग्रवाल यांनी विधिज्ञ सुमित महेश बजाज यांच्या मार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली. या प्रकरणात सुनावणीदरम्यान वकिलांनी आरोपीविरुद्ध यापूर्वीही अनेक खटले प्रलंबित असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन ११वे मुख्य न्यायदंडाधिकारी मा. एन.डी.जाधव यांनी पंचमीयाला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. या खटल्यात तक्रारदारांची बाजू विधिज्ञ सुमित महेश बजाज यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांना अधिवक्त्या वर्षा सदार, अमोल भोसले आणि दिपाली वर्मा यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!