महाराष्ट्र हेड प्रतिनिधी मतिन शेख;
महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्या पैकी बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा हे एक वनसंपदेने नटलेला प्रकल्प आहे. येथे पर्यटकांची चांगलीच गर्दी पहायला मिळत आहे. मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक यांच्या सारखे अधिकारी व पदाधिकारी अंबाबरवा ला भेट देत असतात. येथे वर्षा पर्यटन, तिर्थाटन आणि जंगल सफारीचा आनंद घेता येतो. जैविक विविधता तसेच वन्यजीवांचा अभ्यास करण्याची संधी या अभयारण्यात आहे. नुकतिच नेदरलॅंड येथील लीजा डुपी विदेशी पर्यटकांनी येथे हजेरी लावली आहे. लीजा डुपी हि तिन दिवस अंबाबरवा अभयारण्यातील वनवैभवाचा आनंद घेत आहे. अभयारण्यातील निसर्ग सौंदर्याने आपल्याला भुरळ घातल्याचे लिजा डुपीने सांगितले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले अंबाबरवा अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच विदेशी पर्यटक दाखल झाले आहे त्यांना पाहण्यासाठी चक्क आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसुन आले. दि. ७ ते १० मार्च पर्यत विदेशी पर्यटक मुक्कामी होते. त्याच्या सोबत दिल्लीहुन सोम्या खंदेलवाल, नागपुर येथून रश्मी सातपुते या महिला होत्या. त्या वेळी वसाली येथील गावकरींनी त्यांचा सत्कार केला.

