Saturday, November 21, 2026
HomeUncategorized‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत हिवरखेड पोलिसांची कारवाई; अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत हिवरखेड पोलिसांची कारवाई; अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

(मतीन शेख)

अकोला: ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत हिवरखेड पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका इसमावर कारवाई करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि.३० एप्रिल रोजी हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बेलखेड ता. तेल्हारा येथील मंगेश मनोहर सोळंके वय अंदाजे ३५ हा आपल्या राहत्या घरी अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तहसीलदार, पंच, छायाचित्रकार यांच्यासह बेलखेड येथे छापा टाकला. कारवाई दरम्यान आरोपीच्या घरातून ४९५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त मालाची किंमत सुमारे ६००० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब), (ii) नुसार हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन राठोड, पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले व त्यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!