Tuesday, April 14, 2026
Homeक्राइम न्यूज़ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ग्राम निंबा येथे अवैध दारू अड्ड्यावर उरळ पोलिसांची धाड!...

ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ग्राम निंबा येथे अवैध दारू अड्ड्यावर उरळ पोलिसांची धाड! ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी: मतीन शेख

अकोला: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ‘ऑपरेशन प्रहार’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत उरळ पोलीस ठाण्याच्या पथकाने ग्राम निंबा येथे कारवाई करत ३५ हजार रुपये किमतीचा अवैध गावरान हातभट्टी दारूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता करण्यात आली. उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे, पो.ह. एम.डी. खान, पो.शि.नागेश बाबुळकर, चालक पोकॉ. शुभम बोडके आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मनाली आडे हे शासकीय वाहनासह गस्तीदरम्यान असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, ग्राम निंबा येथे एक इसम अवैधरित्या गावरान हातभट्टीची दारू विकत आहे. सदर माहितीच्या आधारे तात्काळ दोन पंचांना सोबत घेऊन ग्राम निंबा येथे छापा टाकण्यात आला. यावेळी नारायण शालिग्राम डाबेराव (वय ६२, रा.निंबा ता.बाळापूर जि.अकोला) हा त्याच्या राहत्या घराच्या मागील वाडग्यात गावरान हातभट्टीची दारू विकताना आढळून आला. त्याच्याकडून १० लिटर तयार गावरान दारू अंदाजे किंमत २,००० आणि कुंपणात झाकून ठेवलेले २२ टिनाचे टिपे म्हणजेच एकूण ३३० लिटर मोहमाचा सडवा अंदाजे किंमत ३३,००० असा एकूण ३५,००० किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार पंकज कांबळे व त्यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!