Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedआंबोडा येथे जुगार अड्ड्यावर अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई; ६ जण ताब्यात, १लाख...

आंबोडा येथे जुगार अड्ड्यावर अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई; ६ जण ताब्यात, १लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

 

(मतीन शेख)

अकोला : अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ग्राम आंबोडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ६ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान रोख रक्कम व दोन मोटारसायकली असा एकूण सुमारे १ लाख २२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ग्राम आंबोडा येथे गणेश अस्वार यांच्या पानटपरीसमोर काही व्यक्ती इलेक्ट्रिक लाईटच्या उजेडात तितली-भवरा बोर्डवर पैशांचा हार-जीतचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. छाप्यात ६ जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे सागर रविंद्र शिरस्कार, श्रीपाल सुखदेव श्रीनाथ, गोपाल सुखदेव शिरस्कार, गोपाल किसन ताडे, राजेश विनायक वानखडे आणि शिवदास देविदास शिरस्कार सर्व रा.आंबोडा, ता.अकोट, जि. अकोला अशी सांगितली. कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगारासाठी वापरला जाणारा तितली-भवरा बोर्ड, आरोपींकडून मिळालेले २ हजार ६० रुपये रोख तसेच अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव ठासरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात स.पो.उप.नि. वासुदेव ठासरे तसेच पोलीस कर्मचारी हरिष सोनवणे, प्रदीप राऊत, गोपाल जाधव, नंदकिशोर नेमाडे व नितीन तेलगोटे यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!