Friday, September 18, 2026
HomeUncategorizedदम्याच्या आजाराला कंटाळून तरुणाने संपवले जीवन! संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा शिवारातील घटना; तामगाव...

दम्याच्या आजाराला कंटाळून तरुणाने संपवले जीवन! संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा शिवारातील घटना; तामगाव पोलिस ठाण्यात मर्ग दाखल 

(मतीन शेख)

 

संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी येथील २० वर्षीय तरुणाचा पंचाळा शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. दिपक संजय झामरे वय २० रा. टुनकी, ता. संग्रामपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी तामगाव पोलिसांनी मर्ग क्रमांक ४७/२०२६ अन्वये कलम १९४ बीएनएसएसनुसार नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक याला दम्याचा आजार होता. आजाराला कंटाळून तो १८ सप्टेंबर रोजी सकाळपासून घरातून निघून गेला होता. बराच वेळ उलटूनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी गावात तसेच परिसरात त्याचा शोध घेतला. दरम्यान, पंचाळा येथील शेतशिवारात त्याचा शोध घेत असताना नातेवाईकांना शेताच्या धुऱ्यावर दिपकची मोटारसायकल आढळून आली. त्यानंतर विहिरीजवळ पाहणी केली असता तेथे त्याचे चप्पल व मोबाईल आढळले. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आला. शोध घेतल्यानंतर दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास दिपकचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पंचनामा व आवश्यक कार्यवाही करण्यात आली. गजानन प्रल्हाद झामरे वय ६३ रा. टुनकी यांच्या तोंडी अहवालावरून तामगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या आदेशानुसार पोहेकॉ गाडे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!