Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedमित्रांसोबत पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा वान नदीत बुडून बेपत्ता; सोनाळा आणि हिवरखेड पोलिसांकडून...

मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा वान नदीत बुडून बेपत्ता; सोनाळा आणि हिवरखेड पोलिसांकडून शोधकार्य युद्धपातळीवर!

(मतीन शेख)

 

बुलढाणा: वारी हनुमान मंदिर परिसरात मित्रांसह फिरण्यासाठी आलेल्या एका २० वर्षीय युवकावर काळाने घाला घातला. वान नदीच्या पात्रातील खोल डोहात पोहताना तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला. ही घटना शनिवार दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली असून सायंकाळपर्यंत त्याचा शोध सुरू होता. बुडालेल्या युवकाची ओळख योगेश प्रकाश वानखडे वय २०, रा. खुटपुरी, ता. खामगाव, जि. बुलढाणा अशी झाली आहे. योगेश हा मित्रांसोबत वारी हनुमान मंदिर परिसरात फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर सर्वजण मंदिरासमोरील वान नदीत पोहण्यासाठी उतरले. मात्र, नदीतील खोल डोहाचा अंदाज न आल्याने योगेश पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच सोनाळा जि. बुलढाणा व हिवरखेड जि. अकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ हे दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने दोन्ही पोलीस ठाण्यांच्या पथकांनी समन्वयाने शोधमोहीम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे वान नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली असून पाण्याचा वेग आणि खोली अधिक असल्याने शोधकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. योगेशसोबत आलेल्या मित्रांमध्ये ओम प्रशांत बोचरे, आकाश विनोद वानखडे आणि महेश कैलास तायडे, सर्व रा. खुटपुरी, ता. खामगाव, यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!