Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedबालाजी मंदिरातील चांदीचे दागिने चोरी प्रकरण उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल जप्त

बालाजी मंदिरातील चांदीचे दागिने चोरी प्रकरण उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल जप्त

(मतीन शेख)

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बालाजी मंदिरातील रामदेव बाबा मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीस गेल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत फिर्यादी रजनीलाल सुखदेव चांडक यांनी १६ जुलै २०२६ रोजी तामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.१० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बालाजी मंदिरातील रामदेव बाबा मूर्तीच्या चांदीच्या पादुका, चांदीचे छत्र आणि चांदीचा घोडा असा सुमारे ५५० ग्रॅम वजनाचा, अंदाजे १ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करून नेला होता. याप्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे वानखेड येथील अमोल कमलाकर छळकर आणि गजानन सुरेश सोळंके यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला चांदीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली तामगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश बोरसे, संतोष डाखोरकर, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष आखरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद मिरे व तामगाव पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!