Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedशेती साहित्य चोरीला आळा घालण्यासाठी सोनाळा पोलिसांची धडक मोहीम! बावनबीर येथे चार...

शेती साहित्य चोरीला आळा घालण्यासाठी सोनाळा पोलिसांची धडक मोहीम! बावनबीर येथे चार भंगार दुकानांची तपासणी; संशयित हालचालींची माहिती देण्याच्या सुचना

(मतीन शेख)

 

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीत शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोनाळा पोलीस ठाण्याने प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दि.१७ जुलै रोजी बावनबीर गावातील भंगार दुकानांवर अचानक झाडाझडती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गावातील चार भंगार दुकानांची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र भंगार दुकानात काहीच संशयित सामान आढळून आले नाही. तसेच भंगार व्यावसायिकांना चोरीचा माल खरेदी अथवा विक्री न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच परिसरात संशयास्पद व्यक्ती, वाहने किंवा वस्तू आढळल्यास त्याची तात्काळ माहिती सोनाळा पोलीस ठाण्याला देण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, भंगार व्यावसायिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. ही कारवाई सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये हेड कॉन्स्टेबल शाकीर पटेल, पोलीस कॉन्स्टेबल तीतरे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास सांगळे तसेच चालक हेड कॉन्स्टेबल इंगळे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!