Tuesday, April 14, 2026
HomeUncategorized१२ तासांत अकोला एलसीबीने बार्शीटाकळी केबल चोरीचा केला पर्दाफाश; ७.५० लाखाच्या मुद्देमालसह...

१२ तासांत अकोला एलसीबीने बार्शीटाकळी केबल चोरीचा केला पर्दाफाश; ७.५० लाखाच्या मुद्देमालसह दोन आरोपी अटक

 

(मतीन शेख)

 

अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद परिसरातील सोलार प्रकल्पातून कॉपर केबल चोरी झाल्याच्या घटनेचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत छडा लावला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ७.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २ फेब्रुवारी रोजी ‘ॲड इन्फ्रा लि.’ कंपनीच्या सोलार प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७० स्क्वेअर एमएम क्षमतेची कॉपर केबल व इतर साहित्य असा एकूण ७.५० लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी संदीप उमेश राय वय २८, रा. सारीपूर, जि.बक्सार, बिहार याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीतील केबल शहेजाद बेग रा.बादशहा नगर पातूर याला विकल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी शहेजाद बेग यालाही अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत सुमारे ७.५० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुद्देमाल पुढील तपासासाठी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. अल्पावधीत गुन्हा उघडकीस आणल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!