दर्यापूर तालुका प्रतिनिधी नावेद सय्यद :
दर्यापुरातील टीचर कॉलनी येथील रहिवासी व महाराजा बूट हाऊस चे संचालक सय्यद वहीद सय्यद हनीफ यांचे राहते घर नवीन नगरपालिका ते बुडी चौक च्या मुख्य रस्त्यावर असून यांच्या घरासमोर मुख्य नाला आहे. गावातील आणि यांच्या परिसरातील सांडपाणी व पावसाचा पाणी घरासमोरील नाल्यात वाहत असतो. नाल्याचा बांधकाम काही महिन्या अगोदर नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले होते. परंतु सदर काम हे नगरपालिका प्रशासनाने अर्धवट सोडून दिल्याने व वारंवार तक्रार करतेने तक्रार केल्यावरही नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सदर नाल्यात दिवसेदिवस घाण व कचरा जमा झाल्याने सय्यद वहीद व परिवारातील व्यक्तींना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. या जमा झालेल्या कचऱ्यामुळे व घाणीमुळे वारंवार परिवारातील लहान मुले आजारी पडत आहेत. दोन दिवस अगोदर नाल्याच्या जमा झालेल्या सांडपाण्यामुळे घरासमोरील पायऱ्या खचून तक्रार करते यांच्या वडिलांचा पाय घसरल्याने त्यांना गंभीर दुःखपात झाली आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले आहे. अश्या घटना वारंवार होत असल्यामुळे संपूर्ण परिवाराला मानसिक त्रास सहन करावे लागत आहे. माझ्या परिवारातील एखाद्या व्यक्तींचा जीव गेल्यावर नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का? असा आरोप सय्यद वहीद यांनी नगरपालिका प्रशासनावर केली आहे, वारंवार नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिल्यावर ही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे, जर पंधरा दिवसाच्या आत उर्वरित भागाचा बांधकाम पूर्ण केला नाही तर मी सहपरिवार आमरण उपोषण करिता नगरपालिका कार्यालयासमोर बसणार अशी प्रतिक्रिया सय्यद वहीद सय्यद हनीफ यांनी दिली आहे नगरपालिका प्रशासन याच्याकडे लक्ष घालणार का हे पाहण्या योग्य ठरणार आहे.

