Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedसंग्रामपूर तालुक्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; अनेक गावांतील बाजारपेठा राहिल्या बंद

संग्रामपूर तालुक्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; अनेक गावांतील बाजारपेठा राहिल्या बंद

(मतीन शेख)

 

बुलढाणा: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला संग्रामपूर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दर्शविला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर कथितपणे केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. संग्रामपूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किशोर भिडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. संग्रामपूर, पातुर्डा, वरवट बकाल, वानखेड, सोनाळा यांसह विविध गावांमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, तर बाजारपेठांमध्ये दिवसभर शांतता आणि शुकशुकाट पाहायला मिळाला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध व्यक्त करत शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले. तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून बंद शांततेत पार पडल्याची माहिती आंदोलनातील पदाधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!