Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedसंग्रामपूर तालुक्यात प्रथमच दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा; १३ मार्चला काटेल धाम येथे...

संग्रामपूर तालुक्यात प्रथमच दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा; १३ मार्चला काटेल धाम येथे आयोजन

 

(मतीन शेख)

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील काटेल धाम येथे दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून दिव्यांग व्यक्तींना योग्य जोडीदार मिळावा आणि त्यांच्या सामाजिक पुनर्वसनाला चालना मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, बुलढाणा, बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्या., बुलढाणा, श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन, जळगाव जामोद, श्री संत गुलाबबाबा संस्था, काटेल धाम तसेच दिव्यांग क्रांती संघटना, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अंध, मुकबधिर तसेच अस्थिव्यंग अशा विविध प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना हक्काचा जोडीदार मिळावा, त्यांच्या आयुष्यात नव्या आशा निर्माण व्हाव्यात आणि समाजात त्यांचे पुनर्वसन व्हावे या उद्देशाने हा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संग्रामपूर तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा आयोजित होत असल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अध्यक्ष व बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, नॅब महाराष्ट्र राज्य युनिटचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, अपर्णाताई कुटे, बुलढाणा अर्बनचे उपाध्यक्ष डॉ. किशोर केला, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मनोज मेरत, दिव्यांग क्रांती संघटना रायगडचे अध्यक्ष बी.जी. पाटील, मानस फाऊंडेशन बुलढाणा अध्यक्ष प्रा. डी.एस. लहाने, श्रीक्षेत्र चांगेफळ संस्थानचे रामभारती महाराज, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी प्रमोद येंडोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धामचे अध्यक्ष नरेंद्र पालांदुरकर, दिव्यांग क्रांती संघटना विदर्भ अध्यक्ष अशोक तायडे, नेत्र चिकित्सक डॉ. नंदू तायडे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्याला नवी उमेद देण्यासाठी साक्षीदार व्हावे, असे आवाहन बुलढाणा अर्बनचे उपाध्यक्ष डॉ. किशोर केला यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!