(दर्यापूर प्रतिनिधी. नावेद सय्यद) महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रत्येक बालगृहातील मुलांना आनंदीत ठेवण्याकरिता प्रत्येक संस्था अधीक्षक किंवा चालक यांनी प्रयत्न रथ राहून त्यांच्या उन्नती करता प्रयत्न करून ती मुले आपलीच आहे असं समजून त्यांच्यासोबत वागले पाहिजे असे प्रतिपादन अंजनगाव तालुका संरक्षण अधिकारी श्री ईश्वर रामराव माकोडे यांनी केले ते दर्यापूर येथील श्री गाडगे महाराज मिशन मुंबई द्वारा संचलित श्री संत गाडगे महाराज बालगृह बनोसा दर्यापूर संस्थेला मासिक भेट प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी मुलांच्या प्रगती बाबत आढावा घेत बालगृहाची तपासणी सुद्धा केली तेव्हा त्यांच्या समवेत दर्यापूर तालुका संरक्षण अधिकारी प्रफुल वसंत पुरी हे सुद्धा होते एवढेच नाही तर उपस्थित मुलांची चौकशी करून त्यांच्या कलागुणांना वाव कसा देता येईल त्यासाठी सुद्धा संस्थेने प्रयत्न करावे असेही प्रफुल पुरी यांनी सांगितले. तसेच संस्था अधीक्षकाने संस्थेचे रेकॉर्ड अद्यावत कसे राहतील यासाठी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. त्याप्रसंगी बालगृहाचे संचालक गजानन देशमुख हर्षल कपले सह बालगृहाचे विद्यार्थी उपस्थित होते.
बालगृहातील मुलांना नेहमी आनंदित कसे राहतील यासाठी प्रयत्न व्हावे==ईश्वर माकोडे
RELATED ARTICLES