(नावेद सय्यद दर्यापूर ता. प्रतिनिधी )शहरामध्ये कार्यरत असलेली अनिल पाटील जळमकर यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणारी शिक्षण संस्था म्हणजे सुभाषचंद्र बोस ज्ञान कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तोंगलाबाद द्वारा संचालित संत तुकाराम इंग्रजी शाळेत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी डॉक्टर सी.व्ही.रमण यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याप्रसंगी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनी व खुल्या प्रश्नमंजुशा आयोजित केली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.जयश्री चौखंडे तर प्रमुख अतिथी म्हणून दिपाली पारडे होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राजक्ता शंखे यांनी केले संचालन आदित्य जुनघरे व पुष्कर भारसाकळे यांनी केले विज्ञान दिवसानिमित्त शाळेत विज्ञान विषयावर निगडित खुल्या प्रश्नमंजुशे चे आयोजन शिक्षिका सुवर्णा कडू यांनी केले परीक्षक म्हणून श्रिजीत वडाळ यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीप खंडारे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी करिता सर्व वर्ग शिक्षिका व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.