महाराष्ट्र हेड प्रतिनिधी मतिन शेख:
आज सकाळी संदिप देशपांडे हे नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्क येथे गेले होते. वॉक करत असतांना काही हल्लेखोरांनी तोंडाला मास्क लावून त्याच्यावर लोखंडी रॉड व स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानकपणे हल्ला झाल्याने देशपांडे प्रतिकार करु शकले नाही. व जखमी होऊन खाली कोसळले. हल्ला होत असतांना शिवाजी पार्क मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु हल्लेखोर हल्लाकरून पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. हा हल्ला नेमका कोणत्या कारणांवरुन झाला या बाबतची माहिती पोलीस तपासातूनच समोर येईल. हल्ला झाल्याची बातमी पसरताच मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे, भाजप आमदार नितेश राणे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हिंदुजा रुग्णालयात संदिप देशपांडे यांना पाहण्यासाठी दाखल झाले आहेत.