(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यात सामाजिक, आरोग्य व जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आरोग्यदूत राजेशभाऊ चोरे यांची श्री संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच, बुलढाणा यांच्या संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील सामाजिक व संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजेशभाऊ चोरे यांनी समाजहिताची भावना जपत आरोग्य जनजागृती, रक्तदान, विविध सामाजिक उपक्रम, युवकांचे संघटन तसेच समाजप्रबोधनाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत मंचाचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर रामराव सरदार यांनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीनंतर संग्रामपूर तालुक्यात कुणबी युवा मंचाचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविले जाईल. युवकांना संघटित करून समाजोपयोगी उपक्रम, शैक्षणिक, सामाजिक व जनजागृती कार्यक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे. राजेशभाऊ चोरे यांच्या नियुक्तीचे विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे विधायक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

