(मतीन शेख)
अकोला: इकरा स्कूल व ज्युनियर कॉलेज हातरूण येथे गुरुवार दि.३ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शाळेतील मुला-मुलींची नेत्र तपासणी करून त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी श्रीमती नलिनी तायडे तसेच आशा सेविका उजमा खातून यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित तपासणी व योग्य काळजी घेण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. शिबिराच्या आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अल्मास परवीन शेख वसीम यांच्यासह निसार अहमद, शेख वसीम, अशरफ खान, शोएब खान, यासीर खान, सय्यद अवेस, अजमत, समीर, नाजीम, मोहम्मद आदी शिक्षक तसेच शहेबाज खान, शेख उबेद, अब्दुल जाकीर व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व विद्यार्थ्यांकडून कौतुक करण्यात आले.