(मतीन शेख)
अकोला : जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात शनिवार दि.२७ जुन रोजी परिसरात झालेल्या जोरदार वादळी पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे हिवरखेड पोलीस स्टेशनच्या इमारतीवरील टीनपत्रे उडाल्याची घटना घडली. अचानक आलेल्या वादळामुळे पोलीस स्टेशनच्या इमारतीचे नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ धावपळ उडाली. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सरकारी इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नुकसानग्रस्त भागाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय इमारतींची सुरक्षा तपासावी, अशी मागणी केली आहे.

